मोठी बातमी ! महाविकास आघाडी फुटली,  स्वबळावर लढणार, काँग्रेसची घोषणा
मोठी बातमी ! महाविकास आघाडी फुटली, स्वबळावर लढणार, काँग्रेसची घोषणा
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील महानगर पालिकेची धामधूम सुरु असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. २९ महानगर पालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर आहे. मात्र अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. 

काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. 

पुढे बोलताना चेन्नीथला म्हणाले की, ‘आम्ही भाजप विरोधात आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू. आम्ही याबाबतचा जाहीरनामा तुमच्यासमोर सादर करू. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group