धक्कादायक प्रकार :
धक्कादायक प्रकार : "या" ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालयात भांडी घासायला लावली ; व्हिडीओ आला समोर
img
Dipali Ghadwaje
पनवेल शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि व्यवस्थापनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ,  शाळेतील विद्यार्थी थेट शौचालयात आणि बेसिनमध्ये ताट धुताना दिसत आहे. शाळेमध्ये दोन मावश्या नियुक्त असताना सुद्धा विद्यार्थीच ताट धुताना दिसत असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे

पनवेल महानगरपालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर क्रमांक सहा धाकटा खांदा या शाळेतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

विद्यार्थी जेवण केल्यानंतर शौचालयात जात आहेत. तसेच शौचालयातील पाण्याने ताट धुवून घेत आहेत. तर, काही विद्यार्थी बेसिनमध्ये ताट धुवून घेत आहेत. विशेष म्हणजे या शाळेमध्ये दोन मावश्या नियुक्त असूनही विद्यार्थीच स्वतःचे ताट धुताना दिसून येत आहेत.

शौचालयाच्या पाण्याचा वापर करून जेवणाची भांडी धुणे, ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आणि धोकादायक बाब आहे. तरी देखील मुलांना हे काम करण्यासाठी भाग पाडले जात आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान आता  मावश्या असूनही मुलांना ताट धुण्यास का भाग पाडले? असा सवाल उपस्थित होत आहे. या व्हिडिओ पनवेल महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group