आता ''या'' शहरात पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी 'श्वान परवाना' घेणे बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई
आता ''या'' शहरात पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी 'श्वान परवाना' घेणे बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई
img
दैनिक भ्रमर
अनेकजणांना प्राणी पाल्याची आवड असते. कुत्रे मांजर पाळणे काहींसाठी जीवापाड असते. आता अशाच कुत्रे पाळण्याची आवड असणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 

आता महाराष्ट्रातील एका शहरात  पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी 'श्वान परवाना' घेणे बंधनकारक होणार असून अनधिकृतपणे प्राणी पाळल्यास होणार कारवाई होणार असलायची ,माहिती समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व पाळीव कुत्र्यांच्या मालकांना वैध श्वान परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. याबाबत महापालिकेने सार्वजनिक सूचना जारी केली आहे.

एनएमएमसी क्षेत्रातील सर्व कुत्र्यांच्या मालकांनी या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे यावर नागरी संस्थेने भर दिला आहे. आवश्यक परवान्याशिवाय कुत्रे पाळणाऱ्या मालकांना कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे अधिकाऱ्याने सांगितले. या उपक्रमाचे उद्दिष्ट संपूर्ण नवी मुंबईत जबाबदार पाळीव प्राण्यांची मालकी सुनिश्चित करणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता मानके राखणे आहे. 

 सूचनेनुसार, एनएमएमसीने त्यांच्या संबंधित वॉर्ड कार्यालयांद्वारे कुत्रा परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पाळीव प्राण्यांच्या मालकांना एनएमएमसीची अधिकृत वेबसाइट www.nmmc.gov.in ला भेट देऊन, आरोग्य विभागाच्या अंतर्गत 'नागरिक सेवा' विभागात जाऊन ऑनलाइन परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group