अरे बापरे...! महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
अरे बापरे...! महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
img
DB
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लोकल रेल्वेमधील महिला डब्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये किरकोळ वादाचे रूपांतर थेट जोरदार मारहाणीत झाल्याचे दिसत आहे.

एकमेकींना शिवीगाळ करत, केस ओढत आणि चापटा-बुक्क्यांचा वर्षाव करत महिलांनी परस्परांवर जबरदस्त हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, यावरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, कारण महिलांमध्ये झालेली ही तुंबळ हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.



मुंबई लोकलमध्ये महिलांची हाणामारी

एकमेकांचे डोके फुटेपर्यंत रक्तबंबाळ होऊन हाणामारी करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. ही घटना कोणत्या लोकलमधील आहे किंवा कधी घडली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, कल्याण रेल्वे पोलिसांकडून या व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे.



ही घटना नेमकी कोणत्या मार्गावरील लोकलमध्ये घडली हे स्पष्ट झालेलं नसून, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे किंवा हार्बर मार्ग यापैकी कुठल्यातरी मार्गावर ही गोंधळाची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित महिलांमध्ये जागा मिळवण्यावरून वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. काही प्रवाशांनी मात्र हा वाद वैयक्तिक कारणावरून झाला असावा, असंही म्हटलं आहे, ज्यामुळे या घटनेमागील नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group