पवईतील आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे आता राजकारण तापले आहे.दरम्यान आता याप्रकरणातील मोठं घडामोड समोर आली आहे.
साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. साहिलच्या आई-वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. साहिलचे आई-वडील पवई आयआयटीच्या गेटवर उपोषणाला बसणार होते. ते उपोषणासाठी मुंबईमध्ये दाखल झाला असता भांडूप पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे आता राजकारण तापले आहे.
साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी भीम आर्मीकडून आयआयटी बॉम्बेच्या मुख्य गेटवर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी भीम आर्मीच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिस आणि आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचेही दिसून आले.