मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. बेस्ट बस कुर्ला येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरली. या अपघातात अनेकजण चिरडले गेले.
भरधाव बेस्ट बस थेट मार्केटमध्ये घुसली. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सध्या भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघातामधील मृतांची आणि जखमींची नावं समोर आली आहेत. या अपघातामध्ये कनिस अन्सारी (५५ वर्षे), आफरिन शाह (१९ वर्षे), अनम शेख (२० वर्षे)या महिलांचा मृत्यू झाला. शिवम कश्यप(१८ वर्षे, विजय गायकवाड (७० वर्षे) आणि फारूख चौधरी (५४ वर्षे) या पुरूषांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.
तर ४ वर्षांची मुस्कात खान, मोहद इजाद, अशुतोष, अनिल शाह, फाजलू अहमद, तनवीर कुरेशी, मोहम्मद सैद, साबीर हुसैन, सुखराम, महेश कुमार, अमन खान, अतुल वनारे, अमर सातकर, दानिश मनसूरी, हरविंदर सिंग, अखतर खान, बशिरा शैख, सरोज कुमार, सुमेद सैय्यद, इरफान शेख, अफताब खान, रेहमुनीस्सा हे जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उमर अब्दुल गुफर याच्यांवर सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरिफ शेख, मेहरबान खान यांच्यावर कोहिनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रविंद्र भावसार, आकाश पराडे, संतोष कदम, विजय ठोंबरे हे पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर कोहिनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोहम्मद मुस्ताफा, अफरोज अहमद, अजामतून शेख, मुजफ्फर शेख, फारूख चौधरी यांच्यावर हाबीब रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर, पंकज सिंग, मेहताब शेख, रेहमत अन्सारी, मुस्तान शेख, फाजलू रेलेमा, सिद्धू कुमार यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फजिल मोहम्मद, सेहजल हिजेसटे यांच्यावर फौझिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहम्मद खान यांच्यावर कुर्ला नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी बस चालक संजय मोरेला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.