भरधाव ट्रेलर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झालाय यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर इतर दोन जण गंभीर जखमी आहे. जालना कडून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून जाणाऱ्या ट्रेलर ने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील सुहास पाटील हे पत्नी मिताली यांना घेऊन कारने जळगाव कडे चालकासह जात होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पाटील दाम्पत्याची गाडी अजिंठा घाटात पोहोचली याच वेळी जालना येथून लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ओव्हरलोड ट्रेलर पाठीमागून आला.या ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ओव्हरलोडेड ट्रेलरने पाटील दाम्पत्याच्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली.
पाचोऱ्यात ढगफुटी, निम्म गाव झालं जलमय ; परतीच्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान
या भीषण अपघातात कार ट्रक खाली दबली गेली. या अपघातात जळगावच्या रहिवासी असलेल्या ६० वर्षीय मिताली सुहास पाटील यांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ वर्षीय सुहास राजाराम पाटील, आणि ४९ वर्षीय योगेश नारायण ओसवाल हे जखमी झाले आहेत.ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फर्दापूर अजिंठा लेणी ती पॉईंट जवळ वळणावर घडली.
नागरिकांनी तात्काळ त्यांना दोघांना बाहेर काढत सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी मिताली पाटील यांना तपासून मृत घोषित केले. तर सुहास पाटील योगेश ओसवाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.