दैनिक भ्रमर : रस्त्यावर वाढणारे अपघात आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचे जाणारे नाहक बळी याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गडचिरोलीमध्ये देखील असाच भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील काटली गावाजवळ पहाटे फिरायला गेलेल्या ६ शालेय मुलांना अज्ञात ट्रकने धडक दिली.
भरधाव ट्रकने या 6 मुलांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे हा भीषण अपघात झाला. सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसली. दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा !
या अपघातात एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून दोघांना नागपुरच्या रूग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. टिंकू नामदेव भोयर (१४), तन्मय बालाजी मानकर (१६), दुषण दुर्योधन मेश्राम (१४), तुषार राजेंद्र मारभते(१४) सर्व राहणार काटली अशी मृतांची नावे आहे. धडक दिल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक पसार झाला. या अपघातानंतर काटली गावावर शोककळा पसरली आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आता पुढील तपास पोलीस करत आहे.