संपूर्ण राज्यात गणेशउत्सवाचा मोठा उत्साह असताना गडचिरीलोतुन मोठी बातमी समोर आली आहे. भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक आज पहाटे चमक झाली. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस सुरू असताना या पावसातही गडचिरोली पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 आणि इतर नक्षलवादी दबा धरून बसले असल्याच्या गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.
शोध मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर या परिसरात शोध घेतला असता 4 जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले असून एक पुरुष आणि तीन महिला नक्षलचा समावेश आहे. याशिवाय घटनास्थळावरून एक SLR रायफल, 02 INSAS रायफल जप्त करण्यात आले आहेत.