भूपतीसह ६० जणांची शरणागती, महाराष्ट्राची नक्षलमुक्तीच्या दिशेनं वाटचाल
भूपतीसह ६० जणांची शरणागती, महाराष्ट्राची नक्षलमुक्तीच्या दिशेनं वाटचाल
img
वैष्णवी सांगळे
नक्षलवादी चळवळ देशात अखेरच्या घटका मोजत असतानाच महाराष्ट्रात या चळवळीला जोर का धक्का बसला. जहाल भूपती या नेत्यासह 60 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. हे सर्व नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. त्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि संविधान हाती घेतले आहे. विकासाचा मार्ग हा बंदुकीच्या धाकावर खुला होत नाही तर लोकशाहीतून वृद्धींगत होतो हे त्यांनी मान्य केले


गडचिरोलीत माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव याच्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर माओवाद मुक्त महाराष्ट्रच्या शक्यतेला जोरदार बळ प्राप्त झाले आहे. माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरो सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आत्मसमर्पण कार्यक्रम आज गडचिरोलीत पार पडतोय. यावेळी शरणागती पत्करणारे माओवादी त्यांचे शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवत आहे आणि मुख्यमंत्री त्यांना संविधानाची प्रत सुपर्द केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group