मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा
img
Dipali Ghadwaje
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. तर घटनास्थळी सुमारे 1 हजार नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.

ही कारवाई जिल्हा राखीव रक्षक दल, बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स, राज्य पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल  आणि कोब्रा बटालियन यांच्या संयुक्त पथकांनी राबवली असून, गुप्तचर माहितीच्या आधारे ही मोहीम आखण्यात आली.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोस्ट वॉन्टेड नक्षल कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा याच्यासह इतर महत्त्वाच्या नक्षल नेत्यांची हालचाल या भागात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती.

त्यानंतर व्यापक पातळीवर ही कारवाई सुरु करण्यात आली. कालपासून सुरू असलेली ही चकमक नडपल्लीच्या पहाडी परिसरात जोरात सुरू असून, सतत गोळीबाराचा आवाज कानावर येत आहे. ड्रोनच्या माध्यमातून चकमकीवर सुरक्षा दल सतत लक्ष ठेवून आहे.  

1 हजार नक्षलवाद्यांना घेरले

आता पर्यंत या चकमकीत घटनास्थळी पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून, अजून काही जखमी नक्षलवाद्यांची उपस्थिती नाकारता येत नाही. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे.

दरम्यान, तीन राज्यांतील 20 हजारांहून अधिक सुरक्षा दलाचे जवान या कारवाईत सहभागी असून, सुमारे 1 हजार नक्षलवाद्यांना घेरण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group