छत्तीसगडमधील मुंगेली येथे मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. स्मेल्टिंग प्लांटची चिमणी कोसळल्याने 25 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 9 कामगारांचा मृत्यू झालाय.
दरम्यान, ढिगाऱ्याखालून दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले असून जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनन व्यवस्थेने बचाव कार्याला सुरुवात केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कारखान्याची चिमणी कोसळल्याने 25 पेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. दरम्यान यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. मात्र मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमी कामगारांवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे. लोखंड बनवण्याच्या कारखान्यातील सायलो स्ट्रक्चर कोसळल्याने हा अपघात झालाय. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
ही दुर्घटना सरगाव येथील रामबोड या भागात घडली आहे. प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. ही दुर्घटना लोखंडी पाईप बनवण्याच्या कारखान्याचे बांधकाम सुरू असताना घडलीये.