नक्षलवाद विरोधात देशातील सर्वात मोठी कारवाई, ७०० नक्षलवाघांना दहा हजार पोलिसांनी घेरले ; चकमक सुरूच
नक्षलवाद विरोधात देशातील सर्वात मोठी कारवाई, ७०० नक्षलवाघांना दहा हजार पोलिसांनी घेरले ; चकमक सुरूच
img
Dipali Ghadwaje
छत्तीसगडमध्ये दहशतवाद विरोधात मोठी कारवाई सुरक्षा दलांनी सुरु केली आहे. छत्तीसगड पोलीस डीआरजी, कोब्रा बटालियन व सीआरपीएफ अशा तीन तुकड्याच्या माध्यमांनी ऑपरेशन सुरु केले आहे. 36 तासांपासून ऑपरेशन सुरू आहे. 700 नक्षलवाघांना दहा हजार पोलिसांनी घेरले आहे.

गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांमध्ये मायावी आणि मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा या ठिकाणी आहे. चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहे. हिडमा या चकमकीत बचावला आहे.

बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा या पहाडीवर नक्षलवाद्यांचे मुख्य सूत्रधार असलेले नेते वास्तव्य करतात. या भागांत 36 तासांपासून अभियान सुरु करण्यात आले आहे.

छत्तीसगड पोलीस डीआरजी, कोब्रा बटालियन व सीआरपीएफ अशा तीन तुकड्याच्या माध्यमांनी ऑपरेशन सुरु केले आहे. या भागांत 700 च्या वर नक्षलवादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यावर पोलीस बळ वाढवण्यात आले आहे. दहा हजार पोलिसांनी या पहाडीला घेराव केला आहे. साडेचार ते पाच तास चकमक चालली. त्यात सात नक्षलवाद्यांना कंट्स्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले. सध्या चकमक थांबली तरी कोंबिंग ऑपरेशन या भागात सुरूच आहे.

नक्षलवाद्यांचे मोठे नेते हिडमा, देवा यांना टार्गेट करण्यासाठी पोलिसांनी या पहाडीला घेराव केला आहे. हिडमा या चकमकीत थोडक्यात बचावला आहे.

सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहे. सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर असलेल्या कर्रेगुट्टा टेकड्यांना वेढा घातला आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद केले आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group