पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या ४ दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या ४ दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर
img
Dipali Ghadwaje
जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. अंगावर लष्कराचा गणवेश आणि हातामध्ये AK-47 रायफल घेऊन एकत्र उभे राहिलेला दहशतवाद्यांचा हा फोटो समोर आला असून सध्या तो व्हायरल होत आहे. 

सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे स्केच काही वेळापूर्वी जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा फोटो समोर आला आहे. हा भ्याड हल्ला करण्यापूर्वीचा हा दहशतवाद्यांचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे.

लष्करी जवानांच्या गणवेशात या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या चार दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले.

फोटोमध्ये दिसणाऱ्या या दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांचा जीव घेतला. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोएबा'च्‍या रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कर-ए-तोएबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह खालिद आहे. ३ संशयित दहशतवाद्यांची नावं देखील समोर आली आहे.

आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबु तल्हा अशी या दहशतवाद्यांची नावं सांगितली जात असून त्यांचे स्केच देखील जारी करण्यात आले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्यात आमचा हात नसल्याचे सांगितले. एनआयएची टीम पहलगाममध्ये तपास करण्यासाठी दाखल झाली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group