मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी
img
Dipali Ghadwaje

भारत सरकारने आज सोमवारी 17 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातली. यामध्ये क्रिकेटपटू शोएब अख्तर डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे.

सरकारचे म्हणणे आहे की हे चॅनेल भारत आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवत आहेत. गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर सरकारने ही कारवाई केली आहे.

आज जम्मू-काश्मीर विधानसभेतही विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यामध्ये पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. सूत्रांनी सांगितले की, हे छापे पीओकेमधून कार्यरत असलेल्या आणि पहलगाम हल्ल्याशी संबंध असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही याला प्रत्युत्तर दिले.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group