अमेरिकेचा पाकिस्तानला दणका! TRF ला दहशतवादी संघटना घोषित केले
अमेरिकेचा पाकिस्तानला दणका! TRF ला दहशतवादी संघटना घोषित केले
img
Dipali Ghadwaje
अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत द रेजिस्टेंस फ्रंट या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

अमेरिकेनेच हे काम केलं आहे. 22 ऑगस्ट रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. अतिरेक्यांनी फक्त हिंदू धर्मियांना गोळ्या घालून मारले होते. या हल्ल्याची जबाबदारी TRF ने स्वीकारली होती.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी सांगितले, की TRF पाकिस्तान पुरस्कृत लश्कर-ए-तैयबा या संघटनेची प्रॉक्सी आहे. ज्याला संयुक्त राष्ट्रसंघाने आधीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. हा निर्णय ILA Section 219 अंतर्गत INA आणि Executive Order 13224 नुसार घेण्यात आल्याचे रुबियो यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या या निर्णयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

टीआएफने आधी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. सन 2008 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला होता.

टीआरएफने भारतीय सुरक्षा दलांवर हल्ल्याचीही जबाबदारी घेतली आहे. आता अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयानंतर टीआरएफच्या आर्थिक आणि दळणवळणाच्या संसाधनांवर अमेरिकेचे निर्बंध लागू होतील. तसेच जागतिक पातळीवर या संघटनेला दहशतवादाचे प्रायोजक म्हणून घोषित केले जाईल.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group