अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत व्यवसाय करणाऱ्या देशांवर टीका केली असून आणखी कठोर दंडाची धमकी दिलीय. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर त्यांचा निशाणा होता. ट्रम्प यांनी रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले आहेत. मागील काही दिवसांपासून इराणवर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहे.
इराण मोठ्या प्रमाणात अणु कार्यक्रम आणि घातक मिसाईल तयार करत असल्याचे त्यांनी म्हटले, इराणला मदत करणाऱ्या कंपन्यांवर त्यांनी थेट कारवाई केली आहे. ज्यामध्ये काही व्यक्तींचा देखील समावेश आहे. फक्त हेच नाही तर रशियन तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांची अमेरिकेतील मालमत्ता देखील ताब्यात घेण्यात आल्या.
इराणला लवकरच ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, रिपब्लिकन पक्षाचे कायदेकर्त्यांनी मॉस्कोशी व्यावसायिक संबंध असलेल्या देशांवर निर्बंध लादण्यासाठी कायदा तयार केला आहे. जो अत्यंत महत्वाचा आहे. मी या यादीमध्ये इराणचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.