विमान अपघाताच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमुळे देशातच नव्हे तर जगभरात खळबळ उडाली होती.गुजरातच्या अहमदाबाद शहरात 12 जून 2025 रोजी एक मोठा विमान अपघात झाला होता. या वेळी एअर इंडियाचे एक विमान क्रॅश झाले होते. या अपघातात 241 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विमान प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात होता.

बुधवारी पुन्हा विमान अपघाताची घटना समोर आली आहे. ही घटना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातुन समोर आली आहे. बुधवारी रात्री लागार्डिया विमानतळावर दोन विमाने पार्क करत असताना एकमेकांवर धडकली. ही दोन्ही विमाने डेल्टा एअरलाईन्सची होती आणि या अपघातात दोन्ही विमानांचे मोठे नुकसान झाले आहे.डेल्टा एअरलाईन्सचे एक विमान गेटच्या दिशेने जात असताना, दुसरे विमान लँडिंगनंतर गेटकडे येत होते, त्याच वेळी हा भीषण अपघात झाला.
धडक इतकी जोरदार होती की, एका विमानाचा पंख दुसऱ्या विमानाच्या नाकावर आदळला आणि त्या धडकेत पंख तुटून खाली पडला. पायलटने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण अपघात टळला नाही. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.