अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी वार्षिक H1B व्हिसा शुल्कात $100,000 किंवा ८३ दशलक्ष रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. या निर्णयाचा अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून या नवीन बदलाचा विशेषतः आयटी उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे भारताला मोठा धक्का बसला होता त्यात अमेरिकेने H-1B व्हिसावरील फीस थेट वाढवली असून साधारणपणे ८३ लाख रूपये लावण्यात आली.
H-1B व्हिसावरच भारतीय नागरिक हे अमेरिकेत नोकऱ्या करतात. या नवीन नियमामुळे अनेक जण अडचणीत सापडल्याचे बघायला मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प सरकारने लावलेला हा निर्णय 21 सप्टेंबर 2025 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना थेट अलर्ट पाठवलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय नोकरदार वर्ग अडचणीत सापडला. कारण H-1B व्हिसा सर्वात जास्त भारतीय नागरिकांकडेच आहे.
इमिग्रेशन अटॉर्जी आणि टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा इशारा देत लगेचच अमेरिकेत परत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाही तर त्यांना अमेरिकेत येण्यापासून रोखले जाईल किंवा ते फसतील. सोशल मीडियावर सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा एक मेल तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सध्या H-1B व्हिसा धारक हे मोठ्या संख्येने सुट्टीवर अमेरिकेच्या बाहेर आहेत. मात्र, त्यांना तात्काळ अमेरिका गाठण्यास सांगितले असून अमेरिकेतच राहा, असे स्पष्ट सांगण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या H-1B व्हिसाच्या निर्णयामुळे टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची नोकरी धोक्यात आहे.