त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळ तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडूनही तीव्र निषेध व्यक्त
त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळ तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडूनही तीव्र निषेध व्यक्त
img
दैनिक भ्रमर
त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आज साधू-महंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ कमानीजवळ हल्ला झाला. प्रवाशी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने पत्रकारांना मारहाण केली आहे. या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे

या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात घडली. येथे गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी, पत्रकारांवर अचानक हल्ला केला. पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

या हल्ल्यात झी २४ तासचे नाशिक ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही मराठीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे नाशिक ब्युरो चीफ किरण ताजणे यांना बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यात किरण ताजणे यांच्या डोक्यावर पाठीमागून छत्रीने जोरदार प्रहार करण्यात आला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

 जखमी पत्रकारांना तात्काळ त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी असलेल्या पत्रकार किरण ताजने यांना उपचारासाठी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. 

दरम्यान, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. तर नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी पोहचत जखमी पत्रकार किरण ताजने यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी पोलिसांना दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण केल्या आहेत.असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे. 

तसेच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री नाशिकमध्ये दाखल होणार असून ते जखमी पत्रकारांची भेट घेणार आहेत.  पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण केल्या आहेत.

मंत्री विखेंकडूनही घटनेचा निषेध
या घटनेबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, माध्यम प्रतिनिधींवर स्थानिक तरुणाकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. प्रसारमाध्यमे लोकांच्या समस्या, वास्तव आणि सत्य समाजासमोर मांडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांवर हल्ला करणे, हे अत्यंत निंदनीय असून कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींवर तातडीने आणि कडक कारवाई करावी.


इतर बातम्या
Join Whatsapp Group