ट्रम्प यांना धक्का, भारत मोठा डाव खेळणार, नुकसान टाळण्यासाठी 'ही' पाऊले उचलणार
ट्रम्प यांना धक्का, भारत मोठा डाव खेळणार, नुकसान टाळण्यासाठी 'ही' पाऊले उचलणार
img
वैष्णवी सांगळे
अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लागून मोठा धक्का दिला. ज्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणामुळे भारतीयांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. शेवटपर्यंत भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि भारतावर शेवटी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हे ही वाचा 
धक्कादायक ! भाजप नेत्यावर कोयत्याने हल्ला, प्रकृती गंभीर; परिसरात खळबळ

५० टक्के टॅरिफ लावण्यात आल्याने भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर थेट परिणाम होणार आहे. हेच नाही तर उद्योजकांनी मोठा निर्णय घेतल्याचे देखील कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज, नोएडा आणि तिरुपूर येथील कापड आणि वस्त्र उत्पादकांनी उत्पादन थांबवले आहे.  

हे ही वाचा 
नाशिक : फेसबुकवर विवाहितेशी मैत्री, बहाणे देत भामट्याने केले असे काही की...

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर ७० टक्के निर्यात कमी होणार हे स्पष्टच आहे. आता हे नुकसान कसे भरून काढायचे याकरिता सरकारमध्ये उच्चस्तरीय बैठका होत आहेत. भारताने युरोपियन युनियन, युनायटेड किंग्डम, युरेशियन इकॉनॉमिक युनियन आणि पूर्व आशियावर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.

हे ही वाचा 
प्रवासी "गोदावरीच्या राजा"ला लागला ब्रेक प्रवाशांसह चाकरमाने,शालेय विद्यार्थी आणि नागरिकांचे हिरमोड

दुसरीकडे भारताला रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा फायदा देखील होण्याची शक्यता आहे. रशियाकडून हे अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, आम्ही भारताच्या वस्तूंची आमच्या बाजारपेठेत स्वागत करू. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारत हा चीनसोबत हातमिळवणी करताना सध्या दिसत आहे. मोदी हे लवकरच चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group