अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून जणू टॅरिफ बॉम्ब घेऊन भारताच्या मागेच लागले आहे. या बेकायदेशीर टॅरिफमुळे अमेरिकेच्या कोर्टाने देखील याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले होते. मात्र, त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प माघार घ्यायला तयार नाही.
भारतावर काही दिवसांपूर्वीच मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. व्यापार करारदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी केला. पण भारतावर आता अतिरिक्त 15 टक्के टॅरिफ लागणार की नाही? याबद्दल भूमिका स्पष्ट केली नाही. भारतावर टांगती तलवार कायम आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेतला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या सोलरपॅनेलवर १२६ टक्के टॅरिफ लावण्याची धक्कादायक घोषणा केली. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे म्हणणे आहे की, भारत सरकारकडून उत्पादकांना चुकीच्या पद्धतीने आर्थिक मदत केली जात आहेत. ज्यामुळे अमेरिकी कंपन्यांचे नुकसान होत आहे. हा भारतीय सोलर कंपन्यांसाठी अत्यंत मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेमध्ये भारतीय सोलरची मागणी जास्त आहे, 2024 मध्ये भारताने अमेरिकेत 792.6 मिलियन डॉलर सोलर पॅनेल अमेरिकेत निर्यात केले होते. पण आता सोलर पॅनेलवर 126 टॅरिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्याने भारतातून अमेरिकेत सोलर पॅनेल पाठवणे जवळपास अशक्यच आहे. ज्यामुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होणार आहे. इतक्या मोठ्या टॅरिफनंतर भारत नक्की काय प्रतिक्रिया देतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.