डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा यूटर्न, भारताला सर्वात मोठा झटका !
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा यूटर्न, भारताला सर्वात मोठा झटका !
img
Nandini khandare More

अमेरिका आणि इरामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ निर्माण झालेली आहे. भारतासह जगातील अनेक देशांवर याचे विपरीत परिणाम झाले आहेत. याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांचा हा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. अमेरिका आणि इरामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संपूर्ण जगाचं लक्ष ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या बैठीककडे लागलं होतं. मात्र या बैठकीमधून भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 

अमेरिकेच्या पुर्वीच्या राष्ट्रपतींचं परराष्ट्र धोरण असं होतं की चीनला रोखण्यासाठी ते भारताकडे एक पर्याय म्हणून पाहात होते, चीनला रोखण्यासाठी भारताला ताकद पुरवण्याचं काम अनेकदा अमेरिकेकडून झालं. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा यूटर्न घेतल्याचं पहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल केला आहे. ज्यामध्ये अमेरिकेनं आता पहिल्यांदाच चीनला आपला मित्र बनवण्यास सुरुवात केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेवरून चीनला रवाना होताना देखील चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. मी तुमचा मित्र आहे, हे सांगताना मला आनंद होतो असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. दरम्यान शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चीनने तैवानवरून अमेरिकेला उघड-उघड धमकी दिली मात्र तरी देखील ट्रम्प शांतच होते, यावरूनच आता अमेरिकेला चीनसोबत मैत्री वाढवायची आहे, हे स्पष्ट होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group