...इतकी सुंदर आणि आकर्षक बायको असल्यानेच त्याला मंत्रीपद दिले, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळकनक खुलासा
...इतकी सुंदर आणि आकर्षक बायको असल्यानेच त्याला मंत्रीपद दिले, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळकनक खुलासा
img
वैष्णवी सांगळे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असलेले नाव. डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील आणि कधी काय निर्णय घेतलील याचा अजिबातच नेम नाही. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केले, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की,  त्यांनी डग बर्गम यांची अमेरिकेचे गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे कारण त्याची पत्नी कॅथरीन बर्गम आकर्षक आणि सुंदर वाटली म्हणून. 

एका कार्यकारी आदेशावर सही करण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी थेट विधान केले. डोनाल्ड ट्रम्प स्पष्ट शब्दात कॅमेऱ्याच्या पुढे बोलताना म्हटले की, ज्या व्यक्तीची पत्नी इतकी सुंदर आणि आकर्षक आहे, त्याला ते नोकरी देणार आहेत. कॅथरीन बर्गमकडे बोट दाखवत त्यांनी असेही म्हटले, ज्याच्याकडे अशी पत्नी आहे तो कौतुकास पात्र आहे.

कॅथरीन बर्गम याच्याकडे इतकी सुंदर आणि आकर्षक पत्नी असल्यानेच मी त्याला मंत्रीपद दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधाानाने मोठी खळबळ उडाली. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. ट्रम्प यांच्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे तर अनेकांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका देखील केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group