हवेत असलेले डोनाल्ड ट्रम्प हे टीकेचे धनी ठरत आहे, टॅरिफमुळे अमेरिका आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांच्या व्यापाऱ्यावर देखील या टॅरिफचा मोठा परिणाम झाला आहे. फक्त भारतातूनच नाही तर अमेरिकेतूनही या टॅरिफला जोरदार विरोध होत आहे. दोन्ही देशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. भारतातून अमेरिकेत होणारे मोठी निर्यात बंद झाली असून भारत हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध मार्ग शोधत आहे. नुकताच काही देशांसोबत मुक्त व्यापार करार भारताने केला. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्याचे बघायला मिळतंय.

अमेरिकेतील १९ खासदारांनी एक पत्र लिहून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मोठी मागणी केली. भारतासोबतचे संबंध सुधारा आणि भारतावर झिरो टॅरिफ लावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले. खासदार डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांनी हे पत्र डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिले. त्यांनी म्हटले की, भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफचा थेट परिणाम दोन्ही देशातील व्यापारावर झालाय.
टॅरिफमुळे अमेरिकेतील उद्योगांवर थेट परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या कंपन्यांना देखील भारतीय वस्तूंचा मोठा फायदा होतो. भारतातून अमेरिकेत कमी निर्यात होत असल्याने अमेरिकेतील नोकऱ्या देखील धोक्यात आल्या आहेत. आपण भारतासोबत चुकीचे वागत असल्याने भारत चीन-रशिया यांच्या अधिक जवळ जात आहे.हे अमेरिकेसाठी अत्यंत धोकादायक आहे.
अमेरिकेला चीनच्या विरोधात लढायचे असेल तर भारत खूप जास्त महत्वाचा आहे. भारत रशिया आणि चीनच्या जवळ जात असल्याने हा अमेरिकेसाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे, असेही या खासदारांनी आपल्या पत्राता म्हटले. हेच नाही तर त्यांनी स्पष्टपणे मागणी करत म्हटले की, भारतावरील टॅरिफ झिरो करा. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प नेमका काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. खरोखरच भारतावरील टॅरिफ झिरो होणार का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.