अमेरिकीही भडकले! स्वतःच्याच जाळ्यात डोनाल्ड ट्रम्प अडकले
अमेरिकीही भडकले! स्वतःच्याच जाळ्यात डोनाल्ड ट्रम्प अडकले
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेत तणाव असतानाच अमेरिकेसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे. भारतावर टॅरिफ लावणे अमेरिकेला कसे महागात पडणार हे सांगण्यात आलंय. हा अत्यंत मोठा धक्का आहे. आता नुकताच अमेरिकेचे कोलंबिया विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ आणि पूर्व संयुक्त राष्ट्र सल्लागार जेफरी सॅश यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय मुर्खपणाचा असल्याचे म्हटले. जेफरी सॅश यांनी म्हटले की, भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय चुकीचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्यावर उलटा पडणार आहे. 

डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाला कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या अवलंबताना दिसत आहेत. त्यांनी जगभरातील अनेक देशांवर जबरदस्त टॅरिफ लादले आहे. मात्र याचा उलटा परिणाम होताना दिसत आहे. याच वर्षात आतापर्यंत अमेरिकेत ४४६ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. २०२० मधील कोरोना काळातील आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण १२टक्क्यांनी अधिक आहे.केवळ जुलै महिन्यातच तब्बल ७१ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत, जुलै २०२० नंतर एकाच महिन्यात दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

हे ही वाचा... 
चाहत्यांना धक्का ! अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय; म्हणाला, नवीन कर्णधार...

ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात परदेशी वस्तूंवर १०% कर लादला होता. योगायोग असा की, याच महिन्यापासून अमेरिकेत दिवाळखोरीत निघणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत तेजी आली. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ३७१ मोठ्या अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई आणि बेरोजगारी वाढण्याचा धोका देखील आहे. अमेरिकेत २० ते २४ वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण गेल्या तीन महिन्यांत सरासरी ८.१ टक्के आहे, जे चार वर्षांतील सर्वाधिक आहे. 

हे ही वाचा... 
वास्तूशास्त्रानुसार घरात कोणते चित्र लावल्याने होईल फायदा ? वाचा

याशिवाय, खर्च कमी करण्यासाठी, कंपन्या एआयचा वापर करत आहेत आणि एन्ट्री लेव्हल जॉब्ज कमी करत आहेत. याच बरोबर, महागाईनेही पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. पीपीआय महागाईत ०.९ टक्क्यांनी वाढली आहे, जी २०२२ नंतर सर्वाधिक आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group