माझंच खरं आणि मीच योग्य त्यामुळे सर्व काही मी सांगितल्याप्रमाणेच झालं पाहिजे हा अहंकार, मीपणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहायला मिळतोय. भारतासोबत वाद निर्माण करून आता अमेरिका अफगाणिस्तानसोबत वाद घालण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानवर बग्राम हवाई तळ पुन्हा देण्यासाठी दबाव टाकत आहेत. मात्र, अमेरिकी लष्कराचा बग्राम हवाई तळावरील ताब्याला अफगाणिस्तानने विरोध केलाय.

अफगाणिस्तानसाठी अनेक देश मैदानात आले असून त्यांनी थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतलीय. यामध्ये भारत देखील आहे. भारत, रशिया, चीन, इराण आणि इतर सात देशांनी मिळून स्पष्ट म्हटले की, अफगाणिस्तानात कोणत्याही परदेशी लष्करी पायाभूत सुविधा तैनात करण्यास विरोध आहे. ‘मॉस्को फॉरमॅट’ बैठकीत या देशांनी अफगाणिस्तानातील शांतता, स्थिरता आणि विकास यावर चर्चा केली. यानिमित्ताने अमेरिकेच्या विरोधात प्रमुख आशियाई शक्ती एकत्र आल्याचं पहायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले होते की, अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात दिले पाहिजे. कारण ते हवाई तळ अमेरिकेने तयार केले आहे. बायडेन यांची सर्वात मोठी ती चूक होती अमेरिकी सैन्याचा ताबा तिथून काढण्याची. परत एकदा अमेरिकी सरकार बग्राम हवाई तळावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
भारत, रशिया, चीन, इराण आणि इतर सात देशांनी मिळून अमेरिकेविरोधात भूमिका घेतली असून अफगाणिस्तानला पाठिंबा दिला आहे. सध्या बग्राम हवाई तळावर अफगाणिस्तानचे नियंत्रण आहे. भारत, चीन आणि रशियाने अफगाणिस्तानला आर्थिक मजबूत करण्यावरही भाष्य केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये बग्राम हवाई तळ अमेरिकेच्या ताब्यात जाऊ नये, अशी सर्वांची भूमिका आहे. हा अमेरिकेला नक्कीच मोठा धक्का म्हणाला लागेल.