नाशिक शहर आज खुनांच्या घटनांनी हादरले आहे. आज सकाळी जय भवानी रोड आणि सातपूर मध्ये खुनाच्या घटना ताज्या असतानाच तिसरी घटना उघडकीस आले.

नाशिकरोड येथील जेलरोड परिसरात राहणाऱ्या वृद्ध मातेचा तिच्याच मुलाने गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान खून करणाऱ्या मुलाने स्वत: हून पोलिसांच्या येऊन ही माहिती दिली.
रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अरविंद मुरलीधर पाटील (वय 58, रा. शिवाजीनगर, जेलरोड, नाशिक) हे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे येऊन सांगू लागले की, “मी आईच्या वृद्धापणाला कंटाळून तिचा गळा दाबून खून केला आहे. मला अटक करा.
पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता ते खरे असल्याचे समजले. पोलिसांनी संशयित मुलास ताब्यात घेतलेले असून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.