क्या चोर बनेगा रे ! चोरी करून थकला आणि तिथेच झोपला ; जाग आल्यावर पाहिलं तर...
क्या चोर बनेगा रे ! चोरी करून थकला आणि तिथेच झोपला ; जाग आल्यावर पाहिलं तर...
img
वैष्णवी सांगळे
केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये मात्र एका अजब चोराची गजब कहाणी समोर आली आहे. शाळेत चोरी करण्यासाठी गेलेला चोर चोरी करून थकला अन तिथेच झोपी गेला. सकाळी जाग आल्यावर डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून घाबरून गेला. 


तिरुअनंतपुरममध्ये अटिंगल येथे घडलेल्या चोरीच्या प्रकरणाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु झाली. शुक्रवारी २३ वर्षीय विनेश चोरी करण्यासाठी सीएसआय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेला. त्याने अनेक खोल्या फोडल्या, त्यांची झडती घेतली आणि कॅश काउंटर उघडले. एवढंच नव्हे तर त्याने यूपीएस आणि पॅलिएटिव्ह केअर कलेक्शन बॉक्स देखील फोडले आणि त्यात असलेले पैसे चोरले. पण चोरीनंतर तिथून जाण्याऐवजी तो तिथेच गाढ झोपून गेला

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुरक्षा रक्षक शाळेत आले, तेव्हा त्यांना चोरीच्या खुणा दिसल्या. कॅश काउंटर तुटलेले होते आणि लॉकर उघडे होते. यामुळे सुरक्षा रक्षकाला चोरीचा संशय आला. त्यानंतर तो हायर सेकंडरी वर्गांच्या मजल्यावर गेला असता, तिथे मुलांच्या टॉयलेटजवळ जमिनीवर त्यांना एक तरुण झोपलेला दिसला. जवळच पैसे, एक यूपीएस आणि काही शस्त्रंही पडलेली होती.

ते पाहून सुरक्षा रक्षकांनी लगेचच पोलिसांना आणि शाळा प्रशासनाला घटनेची माहिती दिली. ते ऐकून पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. चोराला उठवून पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा विनेशने पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आणि नंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले. सध्या या चोराची आणि त्याची चोरी प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group