ऐकावे ते नवल! मेंदू खाणाऱ्या
ऐकावे ते नवल! मेंदू खाणाऱ्या "या" संसर्गामुळे तीन मुलांचा मृत्यू, काय आहे नेमकं प्रकरण ?
img
Jayshri Rajesh
केरळ येथील कोळिकोड येथे 14 वर्षीय मृदूल, कुन्नूर येथील 13 वर्षीय दक्षिणा आणि मल्लापुरम येथील 5 वर्षीय फतवा यांचा मेंदू खाणाऱ्या अमिबा या संसर्गामुळे मृत्यू झाला. यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांच्या मते, ज्या लोकांना हा संसर्ग होतो त्यापैकी 97% लोकांच्या मेंदूच्या टिशू नष्ट होतात, त्यामुळं मेंदूवर सूज येते आणि मृत्यू होतो.

नेमके प्रकरण काय?

मृदूल हा सातव्या वर्गात शिकत होता. एक दिवस तलावात पोहून आल्यानंतर त्याला डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.आधी त्याला कोळिकोडमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.तिथे केलेल्या तपासणीनंतर, त्याची तब्येत मेंदू खाणाऱ्या अमिबामुळं बिघडल्याचं निदान झालं. त्याला प्रायमरी अमिबिक मेनिंजिओसिफॅलिटिस असं म्हणतात.त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण 24 जून पासून त्याची तब्येत खालावत गेली. कोळिकोड येथील खासगी रुग्णालयातील पेडियाट्रिक ऑंकोलॉजिस्ट डॉक्टर अब्दुल रौब यांनी या  मुलावर उपचार केले.

याच अमिबामुळे कुन्नूर येथील 13 वर्षीय दक्षिणाचा मृत्यू झाला होता. ती मुन्नारला शाळेच्या सहलीला गेली तेव्हा त्याठिकाणी एका स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेली होती. त्याआधी 5 वर्षीय फतवा या मल्लापूरममधील मुलीचा याच अमिबामुळं मृत्यू झाला होता. 1 मे रोजी ती तिच्या घराजवळ असलेल्या काडालुंडी नदीत नातेवाईकांबरोबर अंघोळीला गेली होती.नंतर 10 मे रोजी ती वारंवार बेशुद्ध पडू लागली आणि उलट्या करत होती. एक आठवडा तिच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

मेंदू खाणारा अमिबा काय असतो?

प्रायमरी अमिबिक मेनिंजिओसिफॅलिटिस हा संसर्ग नेग्लेरिया फॅलेरी या मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे होतो.सीडीसी ने दिलेल्या माहितीनुसार हा अमिबा कोमट पाण्यात, नदी आणि तलावात आढळतो.हा अमिबा कायम नदी, तलाव आणि अस्वच्छ स्विमिंग पूलमध्ये आढळतो. या ठिकाणी अंघोळ केली तर नाकावाटे तो शरीरात जाण्याची शक्यता असते.“हा अमिबा नाकावाटे मेंदूत जातो. मेंदूतल्या उती नष्ट करतो आणि त्यामुळं जळजळ व्हायला सुरुवात होते. संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप येतो आणि त्याचा मृत्यू होतो.वॉटर पार्कच्या स्विमिंग पूलमधील पाण्याचं नीट क्लोरिनेशन केलं नसेल, तर तिथंही हा अमिबा आढळतो अशी माहिती सीडीसीने दिली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी बैठक घेत या विषयावर चर्चा केली. त्यांनी काही सूचनाही केल्या.जे स्विमिंग पूल योग्य पद्धतीने क्लोरिनेट केलेले नाहीत तिथे आणि अशुद्ध पाण्यात पोहायला न जाण्याचा सल्ला दिला.लहान मुलांना या संसर्गाचा धोका जास्त असतो त्यामुळे पोहताना स्विमिंग नोझ क्लिपचा वापर करावा आणि संसर्ग टाळावा,असंही त्यांनी सांगितले. 
death | KERALA | CDC |
इतर बातम्या
Join Whatsapp Group