ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
img
Dipali Ghadwaje
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने मालवाहू करणाऱ्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत काल (मंगळवारी) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , सतपाल झेटिंग कावळे ( वय -४५, रामलिंग मुडगड, ता. निलंगा. जी. लातूर) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. 
कावळे हे कर्नाटकाहून माल ट्रकमध्ये भरून पुण्याच्या दिशेने चालले होते.पुणे सोलापूर महामार्ग वरून जात असताना त्यांची ट्रक लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात आली असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतली.  
 
ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ट्रक चालक कावळे खाली उतरले. कावळे यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला व माझ्या छातीत तीव्र वेदना होत असल्याचे फोनद्वारे सांगितले. नातेवाईकांनी जेवण करा व थोड्यावेळ आराम करा असे सांगितले. त्यानुसार कावळे यांनी जेवण केल्यानंतर ते झोपले. त्यानंतर ते उठलेच नाहीत, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी लोणी काळभोर पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली.पोलिसांनी तातडीने ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बनसोडे यांनी कावळे यांची तपासणी केली असता कावळे यांचा उपचारापूर्वीच जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group