गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात घडला.
या अपघातात आतापर्यंत २६५ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विमानात २४२ प्रवासी, दोन पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते.
हे विमान अहमदाबादहून लंडनला जाणार होते. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी प्रवाशांचा मृत्यू झाला.
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. या अपघातानंतर त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
एअर इंडियाच्या माहितीनुसार, विमानात असलेल्या २३० प्रवाशांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते. विमानात असलेल्या इतर १२ जणांमध्ये २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते.
दरम्यान, विमान अपघातात काही मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. डीसीपी कानन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार,विमान डॉक्टरांच्या वसतीगृहात धडकले. वसतीगृहात काही विद्यार्थी जेवायला बसले होते. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. म्हणजेच एकूण २६५ लोकांचा विमान अपघातात बळी गेला.
या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधील मेघानी परिसरात अपघातस्थळी पोहोचले आहेत. अपघातस्थळाची पाहणी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन ते या घटनेसंदर्भात बैठक घेणार आहेत.