अर्ध्या वरती डाव मोडला…; क्रु मेंबर पिंकी माळीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
अर्ध्या वरती डाव मोडला…; क्रु मेंबर पिंकी माळीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
img
वैष्णवी सांगळे
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात जीव गमावलेल्या क्रू अटेंडंट पिंकी माळी यांच्या पार्थिवावर आज, २९ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलीय. क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माळी यांचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर आणि जवळच्या व्यक्तींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यावेळी पिंकी माळीचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिला अखेरचा निरोप दिला. तिच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले जात असून, तिच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना करण्यात येत आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group