बँक मॅनेजरची बँकेतच आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण समोर
बँक मॅनेजरची बँकेतच आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण समोर
img
दैनिक भ्रमर
बारामती शहरात गुरुवारी संध्याकाळी एका आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली. ही आत्महत्या होती एका बँक मॅनेजरची. चांगली नोकरी, चांगला पगार, चांगले पद असतानाही ही आत्महत्या झाली. नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात असणारी 'ती' समस्या बँक मॅनेजरच जीवन मात्र संपवून गेली. भिगवण परिसरात गुरूवारी मध्यरात्री बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य प्रबंधक शिवशंकर मित्रा यांनी बँकेतच गळफास लावून आयुष्य संपवलं.  त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कामाचा दबाव वाढला होता. कामाचा तणाव त्यांना असह्य झाल्याने तसेच बँकेच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी चिट्ठीत लिहिलं आहे. तसेच, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

या चिठ्ठीत त्यांनी पत्नीची माफी मागितली आहे. मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती. बँकेच्या कामाचा ताण त्यांना असह्य झाला होता. शेवटी याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group