दैनिक भ्रमर : छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. व्यावसायिक आणि माजी नगरसेवक राजू तनवाणी यांचा २६ वर्षीय मुलगा दिपेश तनवाणी याने आत्महत्या केली आहे. दिपेशने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
घटनेच्या दिवशी दिपेश फ्लॅटमध्ये होता. त्यानं फ्लॅटमध्येच गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांना तपासात सुसाईड नोट सापडली आहे.
सुसाईड नोटमध्ये त्यानं आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. दिपेशनं सुसाईड नोटमध्ये 'तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही', असं लिहिलं आहे. दरम्यान, दिपेशनं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.