शौचालयात इतका वेळ काय करतोय? दरवाजाही उघडेना, कुटुंबाने दरवाजा तोडताच दिसलं भयानक दृश्य
शौचालयात इतका वेळ काय करतोय? दरवाजाही उघडेना, कुटुंबाने दरवाजा तोडताच दिसलं भयानक दृश्य
img
वैष्णवी सांगळे
फार्मसीचे शिक्षण घेत असलेला २२ वर्षीय ओवेस जुलफीकार मुल्ला या युवकाने टोकाचा निर्णय घेतला. या युवकाने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे घडली आहे.

ओवेसचे वडील डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. हे कुटुंब चिपळूण शहरात राहते. मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ओवेस घरातील शौचालयात गेला, मात्र तो खूप वेळ झाला तरी बाहेर आला नव्हता त्यामुळे कुटुंब चिंतेत पडले. अखेर दरवाजा तोडून आत पाहिल्यावर ओवेसने लोखंडी ग्रीलला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

खळबळजनक ! शिक्षिकाच करायची अल्पवयीन विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ कॉल, वैतागून विद्यार्थ्याने...

या सगळ्याची माहिती तात्काळ चिपळूण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आकस्मिक मृत्यू म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास चिपळूण शहरात घडला अशी माहिती चिपळूण पोलिसांनी आज दिली आहे. आत्महत्या करण्यामागील नेमकं कारण अद्यापही समोर आलेले नाही. ओवेसने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group