गर्लफ्रेंडने दिला धोका... तरुणाने केलं असं काही की तुमचाही चुकेल काळजाचा ठोका
गर्लफ्रेंडने दिला धोका... तरुणाने केलं असं काही की तुमचाही चुकेल काळजाचा ठोका
img
वैष्णवी सांगळे
प्रेमात अपयश आलं की अनेक जण खचून जातात आणि मग आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. असाच एक खळबळजनक प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे. तरुणाने स्वतःचे दुःख व्यक्त करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.आणि त्यानंतर आत्महत्या केली. प्रेयसीने नकार दिल्याने त्याने मोठं पाऊल उचललं आहे. आत्महत्यापूर्वी त्याने रडत रडत त्याचं दु:ख व्यक्त केलं.अत्यंत हृदयद्रावक असा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

रवींद्र बोरसे असं या आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. झाडाला गळफास घेत त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हा तरूण रडताना दिसत आहे. 'तो म्हणतोय की, मी एक गरीब मुलगा आहे. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर काही दिवसाने त्याची प्रेयसी त्याचे खरे प्रेम विसरली आहे. त्याने इतरांना आयुष्यात अभ्यास करण्याचा आणि मोठे होण्याचा सल्ला दिला आहे मात्र प्रेमाच्या जाळ्यात अडकून जाऊ नका, माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका असं देखील तो या व्हिडीओ मध्ये म्हणाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group