जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावामधील भाजपच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव शहरात भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
हे ही वाचा
वैष्णवी साडी सेंटरजवळ रात्रीच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात चौधरी यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी धुळे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा
दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महजान यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते, त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजतय. चौधरी यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तैणात करण्यात आली आहेत.