खळबळजनक ! नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी प्रेयसीने प्रियकराला घरी बोलावले, अन केले असे काही की तुम्हांलाही धक्का बसेल
खळबळजनक ! नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी प्रेयसीने प्रियकराला घरी बोलावले, अन केले असे काही की तुम्हांलाही धक्का बसेल
img
वैष्णवी सांगळे
मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) - सांताक्रुझ पूर्व येथील कलिना परिसरात नववर्षाच्या रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका महिलेने आपल्या प्रियकराचे भाजी कापण्याच्या चाकूने लिंग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ४४ वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाला आहे.

जखमी अवस्थेत त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.  या प्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जखमी व्यक्तीचे नाव जोगिंदर लखन महतो (वय 44) असून ते जांभळीपाडा परिसरात राहत असून खासगी वाहनचालक म्हणून काम करतात. गेल्या 18 वर्षांपासून ते कुटुंबासह या भागात वास्तव्यास आहेत. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, जोगिंदर यांचे त्यांच्या बहिणीच्या नणंदेसोबत म्हणजेच कंचनदेवी राकेश महतो (वय 25) हिच्यासोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

कंचन ही जोगिंदरने त्याच्या पत्नीला सोडून तिच्यासोबत राहण्याचा व लग्न करण्याचा दबाव टाकत होती. या कारणामुळे जोगिंदर यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नोव्हेंबर महिन्यात जोगिंदर मुंबई सोडून बिहारला गेले होते. मात्र, त्या काळातही कंचन सतत फोन करून मुंबईत परत येऊन लग्न करण्याची धमकी देत असल्याचा आरोप जोगिंदर यांनी केला आहे. 19 डिसेंबर रोजी जोगिंदर पुन्हा मुंबईत परतले. मात्र, त्यांनी कंचनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

दि. 31 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 1.30 वाजता कंचनने नववर्षानिमित्त मिठाई देण्याच्या बहाण्याने जोगिंदरला आपल्या घरी बोलावले. त्यावेळी घरात कंचन आणि तिची दोन लहान मुले उपस्थित होती. मुले झोपल्यानंतर कंचनने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने जोगिंदरवर अचानक हल्ला करून त्याचे लिंग कापले. गंभीर जखमी अवस्थेत जोगिंदर कसाबसा आपल्या घरी पोहोचला आणि संपूर्ण प्रकार कुटुंबीय व शेजार्‍यांना सांगितला. त्यानंतर त्यांना तातडीने प्रथम देसाई रुग्णालयात, त्यानंतर पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group