बिहारमध्ये भाजप पर्व! मुख्यमंत्रिपदी सम्राट चौधरी यांनी घेतली शपथ
बिहारमध्ये भाजप पर्व! मुख्यमंत्रिपदी सम्राट चौधरी यांनी घेतली शपथ
img
वैष्णवी सांगळे
आज बिहारमध्ये ‘सम्राट युगा’ची सुरुवात झाली आहे. जवळपास २० वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते सम्राट चौधरी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचे मुख्यमंत्री नियुक्त झाले आहे. भाजप अनेक दशकांपासून या दिवसाची वाट पाहत आहे. अनेक वेळा सत्तेत आले आहेत, पण उपमुख्यमंत्रिपदाच्या पुढे कधीच प्रगती करू शकले नाहीत. 

दरम्यान आजपासून बिहारमध्ये सम्राट चौधरी युग सरू झाले असून त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बिहारला पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाल्याने भाजपमध्ये जोरदार जल्लोष पाहायला मिळत आहे. सम्राट चौधरी हे बिहार राज्याचे 24 वे मुख्यमंत्री बनले. या शपथविधीमध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, जेपी नड्डा आणि चिराग पासवान यांच्या समवेत अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तर विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले. हे दोन्ही नेते JDU पक्षाचे आहे.

आता राज्यसभेचे खासदार असलेल्या नितीश कुमार यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आपले मंत्रिमंडळ बरखास्त केले, ज्यामध्ये सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे महत्त्वाचे गृह मंत्रालयही होते. सम्राट चौधरी तारापूरचे भाजप आमदार आहेत. ते २०१७ मध्ये भाजपमध्ये सामील झाले. यापूर्वी त्यांनी आरजेडी आणि जेडीयूमध्ये काम केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group