आजींचे अंत्यसंस्कार तर झाले पण अस्थिच मिळेना ; नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेताच झाला मोठा खुलासा
आजींचे अंत्यसंस्कार तर झाले पण अस्थिच मिळेना ; नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेताच झाला मोठा खुलासा
img
वैष्णवी सांगळे
जळगावमधील भुसावळ स्मशानभूमीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या अस्थीच तिथे नसल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे नातेवाईकांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. अस्थी शोधूनही न सापडल्याने शेवटी आजींच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आणि या प्रकरणात मोठा खुलासा झाला. 

नेमकं काय घडलं ? 
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे तापी नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत मृतांच्या अस्थींवरुन गोंधळ उडाला. अस्थी चोरीच्या संशयावरून मृत वृद्ध महिलेचे नातेवाईक थेट पोलीस स्टेशनला पोहोचले, मात्र त्या ठिकाणी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. ज्या ठिकाणी वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्याच्या बाजूलाच एका वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अंत्यसंस्कारावेळी हजर नसलेला मुलगा हा उशिरा पोहोचल्याने वडिलांचे अंत्यसंस्कार नेमके कुठल्या जागी झाले? याची माहिती नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार झाले होते, तेथील वडिलांच्या अस्थी समजून त्यामुळे अस्थी संचय करत तापी नदीत विसर्जित केल्या. त्यामुळेहा संपूर्ण गोंधळ उडाला.

या प्रकारानंतर मृत वृद्ध महिलेच्या अस्थी विसर्जित केल्यामुळे तरुणाने कुटुंबीयांची माफीही मागितली. मात्र स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात? त्या ठिकाणी नंबर देण्यात यावे व मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची नोंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group