जळगावात रविवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. दुपारी साडेतीन वाजता जुन्या वादातून धीरज हिवराळे आणि कल्पेश चौधरी या दोन तरुणांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात एकाच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
जळगावमधील सम्राट कॉलनीत राहणाऱ्या धीरज हिवराळे आणि कल्पेश वसंत चौधरी या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य होते. धीरज फुले मार्केटमध्ये काम करत होता. तर कल्पेश त्याच्या घराच्याच जवळ राहायचा. त्यांच्यात पूर्वीपासून खटके उडत होते. त्यांच्यात असलेल्या पूर्ववैमनस्याने रविवारी त्यांच्या वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला. दोघांनीही एकमेकांवर चॉपरसारख्या धारदार शस्त्रांनी वार केले.
धीरजच्या छातीवर, पाठीवर, दंडावर आणि हातावर वार करण्यात आले. धीरजच्या शरीरातून खूप रक्त गेले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. कल्पेशच्या डोक्यात, मानेवर आणि हातावर वार झाले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. कल्पेशला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.