ठाकरे गटाला मोठा धक्का; १३ माजी नगरसेवकांसह माजी महापौरही कमळ हाती घेणार
ठाकरे गटाला मोठा धक्का; १३ माजी नगरसेवकांसह माजी महापौरही कमळ हाती घेणार
img
वैष्णवी सांगळे
स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षबदल अनेकांकडून सुरूच आहे. माजी आमदार , नगरसेवक यासारख्या बडे नेतेही जोरदार पक्षप्रवेश करताना दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जळगावमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 



आज ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. जळगावमध्ये ऐन निवडणुकीच्यावेळेस ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून महापलिकेतील ठाकरे गटाचे १३ माजी नगरसेवक तसेच माजी महापौर नितीन लढ्ढा हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. जळगाव येथील भाजप कार्यालयमध्ये आज संध्याकाळी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.



शिवसेनेत फुट पडल्यानंतर याआधीच अनेक दिग्गज नेते हे शिंदे गटात गेले आहे. त्यात आता अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यामध्ये माजी महापौर लढ्ढा यांच्यासह सुनील महाजन, प्रशांत नाईक, आबा कापसे, प्रतिभा कापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, हर्षा अमोल सांगोरे, जाकीर पठाण, फिरोज पठाण आदींसह इतर काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

संबंधित सर्व पदाधिकारी मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यास भाजपचे महानगर जिल्हाप्रमुख दीपक सूर्यवंशी यांनीही दुजोरा दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group