"मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार, त्यांना काय नेहमी मोठी खाती मिळतात" गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत
img
Dipali Ghadwaje
जळगावातील मातोश्री वृद्धाश्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि  मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, मी गिरीश महाजन यांच्यापेक्षाही मोठा आमदार, ते मोठ्या खात्याचे मंत्री मला काय घेणं देणं? गिरीश भाऊंना नेहमी मोठमोठी खाती भेटतात, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून आपल्या विनोदी शैलीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले की, "गिरीशभाऊंपेक्षा फार मोठा आमदार आहे मी. ते मोठ्या खात्याचे मंत्री असतील मला काही घेणं देणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती भेटतात, पण भाऊ मी ज्या मतदारसंघात राहतो. त्या मतदार संघात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आहे, या ठिकाणी जैन उद्योग समुहाच्या दोन कंपन्या आहेत, आणि केशव स्मृती प्रतिष्ठान सुद्धा याच मतदार संघात आहे, त्यामुळेच मी स्वतःला खूप मोठा आमदार समजतो." मंत्री गुलाबराव पाटलांनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हास्याचे फवारे उडाल्याचं पाहायला मिळालं. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

तसेच यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की "काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. सकाळी मिटींग सुरू झाल्या, तर हे बहादर वरती होतं टेकडीवर, म्हणजे, सगळेजण विरोध करत असताना आमचे गिरीशभाऊ वरती टेकडीवर होते. यांच्यामागे आमचाही सहारा होऊन जातो. सगळे म्हणतात गिरीशभाऊ जळगावते मीसुद्धा सांगतो, मीपण जळगावचा आहे.", असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांवर स्तुतीसुमनंही उधळली आहेत. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group