धक्कादायक ! बलात्कार प्रकरणात ताब्यात असलेल्या आमदाराने पोलिसांवरच झाडल्या गोळ्या, पुढे...
धक्कादायक ! बलात्कार प्रकरणात ताब्यात असलेल्या आमदाराने पोलिसांवरच झाडल्या गोळ्या, पुढे...
img
वैष्णवी सांगळे
आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांना बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र कर्नाल येथील पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच गोळीबार करत तिथून पळ काढल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. आमदार फरार झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचा आमदार हरमीत सिंह ढिल्लो आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरही गाडी घातली. त्यानंतर आमदार हरमीत हा साथीदाराच्या साथीने फरार झाल्याने पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार हरमीत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून फरार झाले आहेत. आमदार आणि त्यांचे साथीदार दोन वाहने घेऊन निघाले होते. पोलिसांना एका कारमधील त्यांच्या साथीदारांना पकडण्यात यश आलं. तर आमदार दुसऱ्या कारने फरार झाला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group