महिलांची सुरक्षितता आजही वाऱ्यावरच आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. झाडाखाली गप्पा मारत बसलेल्या तरुणीजवळ अचानक ६ जणआले आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला पकडून ठेवलं त्यातील ३ जणांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला व या घटनेचा व्हिडिओ ही चित्रित केला आहे. कायद्याची भीती सम्पल्याचंच या घटनेनं पुन्हा अधोरेखित झालं आहे.
नेमका प्रकार काय ?
प्राथमिक माहितीनुसार, परभणीतील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात १४ ऑक्टोबर तरुणी आणि तिचा मित्र झाडाखाली बसून गप्पा मारत होते. यावेळी शेषेराव, करण, साबेर, मुन्या, अर्जुन आणि लखन हे ६ जण अचानक त्या ठिकाणी आले. अर्जुन आणि लखन यांनी तरुणाला पकडून ठेवले, तर करण, शेषेराव आणि साबेर यांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला.

एवढयावरच न थांबता नराधमांनी या घटनेचा व्हिडिओ काढला. घटना समजताच पोलिसांनी सतर्कता बाळगत पीडित तरुणीला विश्वासात घेवून गुन्हा दाखल केला आणि ६ आरोपींना अटक केली आहे.. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी अर्जुन दत्तराव बटकुले, शेख साबेर शेख सत्तार, शेषराव दत्तराव शेवाळे यांच्यासह अन्य तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परभणीत मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तपास सुरू ठेवला असून, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे सखोल अभ्यास केला जात आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची प्रतिक्रिया
भोगाव देवीच्या समोर जाताना असा एक जंगल एरिया आहे आणि तिकडे हे दोघं तिकडे गेले होते . ह्या परिस्थितीचा फायदा घेत पाच सहा मुलांनी अत्याचार केलेला आहे . त्यांना तातडीने पकडण्यात आलेला आहे . आणि धाक बसेल अशीच शिक्षा होईल . परंतु, मी जे मुला मुलींना पण सांगू इच्छिते, कोणीच जात नाही येत नाही अशा ठिकाणी ती लोक गेली होती . समाजामध्ये विकृत मानसिकतेचे लोकांची संख्या जास्त वाढत आहे . त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा समाज म्हणून सरकारने तर कायदे आणलेले आहेत पोलीस तत्पर आहेत .उलट पीडित मुलगी किंवा तिच्या घरचे कोणीच तक्रार द्यायला आले नव्हते. पोलीस केस दाखल करत होते पण अशा परिस्थितीमध्ये समाज म्हणून सुद्धा आपण सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे मुलींनाही मला विनंती करायची की स्वतःच्या सुरक्षिततेचा पहिले विचार आपण केला पाहिजे . अशी प्रतिकिया पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे .