महाराष्ट्र पुन्हा हादरला...! आधी अपहरण अन् मग ... , नाशिकच्या सिन्नर तालुक्यात4 वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर कृत्य
महाराष्ट्र पुन्हा हादरला...! आधी अपहरण अन् मग ... , नाशिकच्या सिन्नर तालुक्यात4 वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर कृत्य
img
Dipali Ghadwaje
नाशिक : बदलापुरात चार वर्षांच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अख्खं बदलापूर मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं. मंगळवारी संपूर्ण देशाच्या नजरा बदलापूरवर खिळल्या होत्या. बदालपुरातील आंदोलनाला काही तास उलटत नाहीत, तोच नाशकातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

नाशिक  जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. नराधमानं चार वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत असताना तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुकली राहत असलेल्या गावातील एका संशयितानं हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. 

मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची सुटका केली. याप्रकरणी आरोपी टिल्लू उर्फ प्रकाश एकनाथ अहिरे वय 26 या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 19 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडल्याचं समोक आलं. फिर्यादीनुसार तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा 351/2024, 137(2),64(1),65(2) प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहे.

नेमकं काय घडलं? 

नाशिकच्या सिन्नरमध्ये धक्कादायक घटना घडली. सोमवारी संध्याकाळी चिमुकली आपल्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी गावातील एक परिचित तरुण चिमुकलीजवळ आला. टिल्लू असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. याच तरुणानं चिमुकलीचं अपहरण केलं. बराच वेळी चिमुकली आली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. पण चिमुकली कुठेच सापडली नाही. त्याचवेळी चिमुकलीसोबतच हा तरुणही बेपत्ता असल्यानं सर्वांचा संशय बळावला. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र तात्काळ हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. चिमुकलीचं त्यानंच अपहरण केल्याचं समोर आलं. 

चिमुकली सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं. याप्रकरणातील संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group