मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. शिक्षणाच्या प्रवाहात वाहण्याच्या वयात विद्यार्थ्यांचे लक्ष भलतीकडेच भटकत आहे. मुंबईतील घडलेली घटना तुमच्याही अंगावर काटा आणेल. एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील मित्रावर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील एका नामंकित शाळेतील ८वीत शिकणारा विद्यार्थी आपल्या वर्गमित्राशी अश्लील वर्तन करायचा. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानंतर त्याने चक्क वर्गमित्रावर त्याच्या घरा जवळील एका निर्जन ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. पीडित मुलाच्या आईने देखील बाजू समजून घेत तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली अन तपासकार्यात भयानक गोष्ट समोर आली.
फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी मुलाने पीडित मुलाला मारहाण केल्याचं समजलं. शिवाय बाथरूममध्ये नेऊन त्याच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. मात्र पीडित मुलाने घाबरून आपल्या कुटुंबियांना याबद्दल काही सांगितलं नाही. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली पुढील तपास सुरू केला आहे.
तसेच शाळा अधिकारी आणि पालकांशी चौकशी करत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर संबंधित शाळेतील मुले आणि पालकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. शाळेतील मुले देखील अशा घटनांना बळी पडत आहे त्यामुळे पालक चिंता व्यक्त करत आहे.