संतापजनक ! मूल होत नाही म्हणून मागायला गेली उपाय झाले भलतेच, महिलेसोबत मांत्रिकाचे धक्कादायक कृत्य
संतापजनक ! मूल होत नाही म्हणून मागायला गेली उपाय झाले भलतेच, महिलेसोबत मांत्रिकाचे धक्कादायक कृत्य
img
दैनिक भ्रमर
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहे. एखादी गोष्ट श्रद्धेपर्यंत मर्यादित आहे तोपर्यंत ठीक पण याच गोष्टीने अंधश्रद्धेचे रूप धारण केले तर त्याचा परिणाम खूप भयानक होऊ शकतो. याचेच एक उदाहरण हाथरस जिल्ह्यातुन समोर आले आहे. लग्नाला ३ वर्ष उलटूनही मुल होत नव्हते म्हणून हाथरस येथील दाम्पत्य चिंतेत होतं. डॉक्टरांकडे उपाय मागण्याऐवजी नवरा बायकोला मांत्रिकांकडे घेऊन गेला आणि तिथे मात्र तिच्यासोबत धक्कादायक कृत्य मांत्रिकाने केले. 

नरखी येथील मुनियाखेडा गावातील रहिवासी भगत चंद्रपाल सिंह हा भुतबाधेवर उपाय करायचा अशी परिसरात चर्चा होती. ५ जुलै रोजी या महिलेला तिचा नवरा आणि नणंद मांत्रिकाकडे घेऊन गेले. मांत्रिकाने त्यांना १२ जुलै रोजी पुन्हा येण्यास सांगितले.

सांगितल्याप्रमाणे १२ जुलै रोजी ते तिघे मांत्रिकाला भेटण्यासाठी मुनियाखेडा गावातील मंदिरात गेले. मांत्रिकाने महिलेला शेतात लाडू पुरण्याचा आणि लिंबू कापण्याचा सल्ला दिला. पीडित महिलेचा आरोप आहे की, तिचा पती मंदिराबाहेर असताना तांत्रिकाने तिच्या नणदेला काही वस्तू आणण्यासाठी पाठवले. 

यानंतर मांत्रिकाने पीडितेला लाडू पुरण्याचा आणि लिंबू कापण्याचा बहाण्याने मंदिरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असलेल्या त्याच्या खोलीजवळील शेतातील एका खड्ड्यात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर मांत्रिकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group