कोलकात्यातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार..आणि निर्भया 2 , काय आहे प्रकरण ?
कोलकात्यातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार..आणि निर्भया 2 , काय आहे प्रकरण ?
img
दैनिक भ्रमर
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नावाजलेलं रुग्णालय आहे. या ठिकाणी सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्टला ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडला, तिच्या शरीरावर कपडे नव्हते, जखमा होत्या, डोळे व तोंडातून रक्त येत होतं. तिच्यावर बलात्कार झाल्याचं पोस्ट मॉर्टेममधून उघड झालं. या घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी एसआयटी स्थापन केली. सुरुवातीच्या तपासानंतर संजय रॉयला अटक झाली. तपासानुसार, पहाटे 3 ते 6 दरम्यान तिच्यावर बलात्कार व हल्ला झाला. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टनुसार, तिचा गळा आवळण्यात आला. तिच्या डोळ्यांतून व तोंडातून रक्तस्राव झाला. धक्कादायक बाब म्हणजे नराधमाने तिच्यावर बलात्कार करण्याआधी तिचा खून केला होता.

ट्रेनी डॉक्टरचा खून व बलात्कार केल्यावर आरोपी संजय घरी गेला व झोपला. पुरावे नष्ट करण्यासाठी कपडे धुतले. तपासात त्याच्या शूजवर रक्ताचे डाग आढळले. घटनास्थळी इअरफोनचा तुकडा सापडला. तसेच संजयचा फोन तपासल्यावर तो अश्लील व्हिडिओ बघायचा असं समोर आलंय. तो दारूही प्यायचा. त्याने चार लग्नं केली असून, त्यातल्या एका पत्नीचा मृत्यू झाला तर तिघी त्याला सोडून गेल्या. या धक्कादायक घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. लोक आरोपीला शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. फेडरेशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स असोसिएशनने  देशभरात पर्यायी आरोग्य सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान , 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता. सहा आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर ते तिला रस्त्यावर फेकून निघून गेले होते. 13 दिवसांच्या उपचारांनंतर निर्भयाचा मृत्यू झाला होता. त्यादिवशी घडलेल्या घटनेने देश हादरला होता. आता अशीच एक घटना पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात घडली आहे. सरकारी रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरबरोबर झालेल्या क्रूर कृत्यामुळे एफएआयएमएने  या प्रकरणाला निर्भया-2 म्हटलंय.

या घटनेनंतर महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगढ, राजस्थान व गुजरातमध्ये विरोध प्रदर्शन होतंय. एफएआयएमएने या घटनेला निर्भया 2.0 म्हटलंय. ते आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना पाठिंबा देत आहेत. त्यांनी देशभरातील डॉक्टरांना मंगळवारी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group